Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पत्रकार भीमराव धुळप यांना केतकी प्रकाशनचा 'साहित्य गौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ( शांताराम गुडेकर ) : धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक तथा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पत्रकार भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप यांना पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'साहित्य गौरव पुरस्कार' केतकी प्रकाशनचे संपादक चंद्रकांत जाधव,साहित्यिक व जेष्ठ नागरिक भवन चे अध्यक्ष. विकास साठे, लेखक रमाकांत जाधव, गजानन म्हात्रे, अजित मगदूम व सौ. वृषाली मगदूम, प्रभाकर जेजूरकर व माजी प्राचार्य सौ. क्रांती जेजूरकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. 

गेल्या अनेक वर्षांपासून निर्भीड पत्रकारिता, समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी वरील सर्व साहित्यिक,लेखक यांचाही गौरव केतकी प्रकाशनच्या वतीने करण्यात आला.

यावेळी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या समाजापुढे न आलेल्या अत्यंत महत्वाच्या आठवणी लेखक प्रथमेश मलईकर यांनी 'History Will Be KINDER' या पुस्तक केतकी प्रकाशन चे संपादक चंद्रकांत जाधव यांनी प्रकाशित केले आहे. सदर कार्यक्रम जेष्ठ नागरिक भवन,सेक्टर,12 नेरूळ,नवी मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |