Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

डोंबिवलीत टोईंग व्हॅन‌ नाही.. वाहतूक पोलिसांचे डोंबिवली शहराच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष

माजी नगरसेवक शैलेश धात्रक आंदोलनाचा इशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) मुंबई व ठाणे शहरातील जवळच शहर म्हणून ओळखल जाणार डोंबिवली शहर. डोंबिवली शहरात वाढत्या लोकसंख्येने शहरातील वाहनांची संख्या वाढली. वाहने वाढली पण वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न अजूनही सुटका नाही. याचा परिणाम रस्त्याच्या दुर्तफा पार्किंग होऊन वाहतूक कोंडी वाढली.अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठि टोईंग व्हॅन‌ची गरज लागते. मात्र परिवहन विभागाला याची गरज वाटतं नसल्याने डोंबिवलीला टोईंग व्हॅन‌ दिली नाही. वाहतूक पोलीस यावर हात वर करत वरिष्ठांना त्यासंदर्भात पत्र दिले आहे असे पत्रकारांना सांगतात. 

यावर माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी वाहतूक पोलिसांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवली शहरात लवकरात लवकर टोईंग व्हॅन‌ धावली नाही तर आंदोलन करू असा इशारा धात्रक यांनी दिला आहे.

माजी नगरसेवक शैलेश धात्रक म्हणाले, अनेक वर्षांपासून शहर वाहतूक विभागाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर टोईंग व्हॅन‌द्वारे कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे वाहनचालकांमध्ये आदरयुक्त शिस्त निर्माण झाली होती आणि वाहतूक सुरळीत राहण्यास मोठी मदत होत होती. तसेच तीनचाकी व चारचाकी वाहनांवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र, डिसेंबर २०२५ पासून आज दिनांक ०३ जुलै २०२६ पर्यंत डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागात चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई पूर्णपणे बंद असल्याचे दिसून येत आहे. याबाबत जागृत नागरिकांनी अनेकदा विचारणा केल्यानंतर "टोईंग व्हॅनचे टैडर संपले असून नवीन टैंडर प्रक्रिया सुरू आहे" असे कारण देण्यात येत आहे. सध्या केवळ दंडात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात महसूल वसूल केला जात आहे, मात्र चुकीच्या ठिकाणी उभी केलेली वाहने जागेवरच राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मार्ग काढणे अत्यंत कठीण होत आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की, चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेली टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागात टोईंग व्हॅनची सेवा पूर्ववत त्वरित सुरु करण्यात यावी.केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता, वाहतूक कोंडी निर्माण करणारी वाहने त्वरित हटविण्याची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर व प्रभावी कारवाई करण्यात यावी, जेणेकरून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध राहील. या अत्यंत महत्वाच्या जनहिताच्या विषयाची पुढील पंधरा दिवसात गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही केली पाहिजे. अन्यथा, जनतेच्या हितासाठी व वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नाकडे वाहतूक पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला लोकशाही मार्गाने व सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्यास व गरज पडल्यास उपोषण करण्यास भाग पडेल, याची कृपया नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |