डोंबिवली ( शंकर जाधव ) गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी चाळीतील घरात शिरले तर काही ठिकाणी रस्तावर पाणी साचले आहे. शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे यांनी त्याच्या मतदार संघात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामीण मधील शिवसेना पदाधिकारी दत्ता वझे व शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार मोरे यांनी ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्या ठिकाणची पाहणी केली. तेथील रहिवाशांशी संवाद साधून धीर दिला. आमदार मोरे यांनी तात्काळ प्रशासनातील संबंधित विभागाला संपर्क साधून योग्य ती उपाययोजना करण्यास सांगितले.
यावेळी आमदार मोरे म्हणाले नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना सदैव उभी असते. कोणततीही अडचण, समडस्या सोडविण्यासाठी शिवसैनिक पुढे असतो. पावसाळ्यात नागरिकांना दिलासा मिळावा व त्याच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. प्रशासनहि नागरिकांच्या मदतीकरता तयार आहे.

