नवी मुंबई: घणसोली येथील शहरी बेघर निवारा केंद्र ह्या ठिकाणी समाजातील वंचित आणि गरजु घटकांना मदतीचा हात देऊन वाढदिवस साजरा करणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे.याच विचाराने प्रेरित होऊन.कोपरखैरणे गावातील रिक्षा चालक - श्री.संदीप गणपत वेटा यांनी आपला ५१ वा आपला वाढदिवस कोणत्याही खर्च टाळुन, स्थानिक शहरी बेघर निवारा केंद्र, घणसोली येथील व्यवस्थापक - राहुल म.वाढे यांच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतलेल्या मा आस्था सामाजिक विकास सेवा संस्था येथील अनाथ महिलांन सोबत अतीशय साधेपणाने आणी आनंदात वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाचे औचित्य साधून बेघर निवारा केंद्रातील अनाथ महिलांन करता प्रत्येकी साड्यांन चे वाटप करण्यात आले.येथील उपस्थित असणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून हा दिवस आपल्याला साठी अत्यंत समाधानकारक आणी अविस्मरणीय ठरल्याची भावना श्री.संदीप गणपत वेटा यांनी यावेळी व्यक्त केली.
अशा विधायक आणी सामाजिक उपक्रमांतुन इतरांनाही वाढदिवस साधे पणाने साजरे करण्याची आणी समाजोपयोगी कामे करण्याची प्रेरणा मिळते.हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी निखील वेटा , स्वप्नील वेटा, हेमंत पाटील,ऋषभ पाटील आणी कुंदन जगताप यांनी विशेष सहकार्य केले.अशी माहिती ग्रामस्थ श्री.अविनाश भरत पाटील यांनी दिली.

