Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विधानभवनात अभिवादन

जयंतीनिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती सचिन अहिर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून पुष्पहार अर्पण

मुंबई | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील विधानभवन परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

या अभिवादन कार्यक्रमास आमदार शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, सचिव-४ शिवदर्शन साठ्ये, सहसचिव राजेश तारवी, उपसचिव विजय कोमटवार (संचालक, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र), जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली. महाराष्ट्राच्या राजकीय, प्रशासकीय आणि सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |