Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शिक्षणातून परिवर्तन घडविणाऱ्या डॉ. मनोहर भोईर यांना ‘जागतिक उद्योजकता दिन अवार्ड २०२६’

Mentor आणि उद्योजक म्हणून उल्लेखनीय कार्याची दखल; मुंबईतील राज्यस्तरीय सोहळ्यात मानाचा सन्मान

प्रतिनिधी | मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०२६ : शिक्षण, प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि उद्योजकांना दिशा देणारे डॉ. मनोहर गजानन भोईर यांना ‘World Entrepreneur’s Day Award 2026’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), मुंबई यांच्या वतीने जागतिक उद्योजकता दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. Mentor म्हणून उद्योजकांना मार्गदर्शन आणि स्वतः उद्योजक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

१० बाय १० च्या झोपडीतून यशाचा प्रवास

ठाणे जिल्ह्यातील नारिवली या छोट्याशा गावात अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. भोईर यांचा प्रवास संघर्षातून घडलेल्या यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत उच्च शिक्षणाचा मार्ग खुला केला.

आज त्यांच्या नावावर Ph.D., M.Sc., B.Ed., B.A. Psychology, DMIT Specialist, Graphologist आणि NLP Practitioner अशा विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहेत. ते प्रशिक्षक, समुपदेशक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.

१० हजारांहून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण

Transwin Training & Consulting LLP या संस्थेच्या माध्यमातून डॉ. भोईर विद्यार्थी, पालक, शिक्षक, युवक, उद्योजक आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवतात.

Mind & Memory Development, Career Guidance, Personality Development, Leadership, Entrepreneurship Mindset, Business Growth आणि Life Skills यांसारख्या विषयांवर त्यांनी आतापर्यंत १०,००० हून अधिक व्यक्तींना मार्गदर्शन केले आहे.

शिक्षणासोबत समाजसेवेची जपली बांधिलकी

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक जनजागृती, वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि स्वच्छता अभियान यांसारख्या सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

“आपल्याला मिळालेले ज्ञान आणि संधी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हीच समाजऋण फेडण्याची खरी पद्धत आहे,” असे डॉ. भोईर यांनी सांगितले.

पुस्तकातून आत्मशोधाचा संदेश

डॉ. भोईर यांनी लिहिलेले ‘शोध स्वतःचा – यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी’ हे पुस्तक आत्मशोध, सकारात्मक विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा संदेश देणारे आहे. वाचनाची विशेष आवड असलेल्या त्यांनी आजवर १,००० हून अधिक पुस्तकांचे वाचन केले आहे.

यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरव

डॉ. भोईर यांना यापूर्वी शिक्षारत्न पुरस्कार २०२३, सर्वोत्कृष्ट Mind प्रशिक्षक पुरस्कार, आगरी गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि स्वामी विवेकानंद पुरस्कार यांसह विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
“यश म्हणजे अधिक जबाबदारीची सुरुवात”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. मनोहर भोईर म्हणाले,

“हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि उद्योजकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा माझा प्रयत्न यापुढेही सुरू राहील.”

संघर्षातून शिक्षण, शिक्षणातून ज्ञान आणि ज्ञानातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा त्यांचा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |