Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

५५ वर्षांवरील नागरिकांसाठी फिरत्या फिजिओथेरपी व्हॅनद्वारे मोफत उपचार -मार्गदर्शन; नरेंद्र पवार फाउंडेशन आणि डिग्निटी फाउंडेशनचा उपक्रम

कल्याण | २४ ऑगस्ट : ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि त्यांचे निरोगी जीवन याला प्राधान्य देत नरेंद्र पवार फाउंडेशन आणि डिग्निटी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ५५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिराला आजपासून सुरुवात झाली. फिरती फिजिओथेरपी व्हॅनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांची तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टकडून तपासणी, आवश्यक उपचार तसेच योग्य व्यायामाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. भाजप नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या प्रमूख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

दैनंदिन जीवनात वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या सांधेदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी तसेच कोपराच्या दुखण्यासारख्या विविध समस्यांवर या शिबिरात उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय फ्रॅक्चरनंतर आवश्यक असलेले व्यायाम आणि पुनर्वसनाबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

या आरोग्य शिबिरात आधुनिक फिजिओथेरपी उपचार पद्धतींचा वापर करण्यात येत असून आयएफटी मशीन, अल्ट्रासाऊंड मशीन, TENS मशीन, ट्रॅक्शन मशीन, मसल स्टिम्युलेटर, एक्सरसाईज थेरपी, बॅलन्स ट्रेनिंग, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ड्राय नीडलिंग थेरपी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

२८ ऑगस्टपर्यंत मोफत उपचाराची सुविधा...

हे शिबिर २४ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कल्याण पश्चिम येथील भाजप नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या कार्यालयात, शिशु विकास शाळेजवळ, शक्ती बेतूरकर चौक, स्वानंद नगरसमोर, बेतूरकर पाडा येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घराजवळच दर्जेदार फिजिओथेरपी सेवा मिळावी आणि उपचारासाठी होणारा त्रास आणि खर्च कमी व्हावा, या उद्देशाने फिरती फिजिओथेरपी व्हॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे नरेंद्र पवार फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले.

पूर्वनोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन...

या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी ५५ वर्षांवरील नागरिकांनी पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्वनोंदणीसाठी ८१६९२११३२७ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही आपल्या आई-वडिलांसह आजी-आजोबा आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांना या मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन यावेळी नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांनी यावेळी केले आहे.

“आपली काळजी… त्यांचे निरोगी आयुष्य!” या भावनेतून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे. नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या पुढाकारातून नागरिकांना ही आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |