Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मातोश्रीवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक; उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन

 
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा व मुंब्रा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पक्षाबद्दलची निष्ठा, संघटनात्मक बांधणी तसेच जनतेसाठी करावयाच्या कामाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

 कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गरुनाथ खोत व कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख पदापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीस कल्याण लोकसभा जिल्हा संघटक रविंद्र सुर्वे, कल्याण लोकसभा जिल्हा संघटिका कल्पना कवळे, कल्याण लोकसभा उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, कळवा शहरप्रमुख लहु चाळके, कळवा उपशहरप्रमुख गुरुदत्त देसाई व नंदू पाटील, तसेच विभागप्रमुख सतीश मांडरेकर, सचिन पारकर, गोपीनाथ पाटील, संतोष कवळे, नंदकुमार दुराफे, दुर्योधन फडतरे, लवेश जाधव, संतोष सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 या बैठकीमुळे दिवा, कळवा व मुंब्रा परिसरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळून आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |