Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील दीड दिवसांच्या श्री गणेश मुर्तीचे अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि शांततेत विसर्जन

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील दीड दिवसांच्या श्री गणेश मुर्तींचे काल रात्रीच्या प्रहरी अत्यंत भक्तीमय व भावपूर्ण वातावरणात आणि शांततेत विसर्जन करण्यात आले. महापालिका क्षेत्रात रात्री पर्यंत ५८८७ शाडु मुर्तींचे आणि १०७७९ पीओपी मुर्तीचे असे एकूण १६६६६ श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.

यासाठी महापालिकेने सर्व प्रभागातील विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती. विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल ,शहर अभियंता अनिता परदेशी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे यांनी इतर अधिकाऱ्यांसमवेत समक्ष विसर्जन स्थळी जाऊन पाहणी केली. महापालिकेच्या वैदयकिय आरोग्य विभागामार्फत प्रमुख विसर्जन स्थळांवर रुग्णवाहिकेसह वैदयकीय पथकाची (डॉक्टर्स,स्टाफनर्स इ.) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. अग्निशमन विभागामार्फत प्रमुख विसर्जन स्थळांवर आवश्यकतेनुसार बोट,लाईफबॉय, लाईफजॅकेट, गोताखोर या सुविधा देण्यात आल्या.

महापालिकेच्या विदयुत विभागामार्फत ८१ ठिकाणी जनरेटर, २६५३ एलईडी, ११५ लाईटनिंग टॉवर, ४२ ठिकाणी २३६ सी.सी.टिव्ही कॅमे-यांची तसेच निगराणी कामी बारा ड्रोन ची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे सीसी टीव्ही मॉनिटर साठी दुर्गाडी गणेश घाट कल्याण, रेतीबंदर ,मोठा गाव डोंबिवली, जुनी डोंबिवली, राजू नगर गणेश घाट डोंबिवली येथे १०*८ फूट एलईडी स्क्रीन लावण्यात आले .

विसर्जन स्थळांवर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत निर्माल्य कलश, साफसफाईसाठी मनुष्यबळ देण्यात आले होते. त्याचप्रमाणे पाच ठिकाणी मोबाईल टॉयलेट व्हॅन आणि सार्वजनिक विसर्जन घाट, तलाव इ. ३० ठिकाणी पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आली होती.विसर्जन स्थळी निर्माण झालेले ३९.२ टन निर्माल्य गणेश मंदिर संस्थान,डोंबिवली येथील खत प्रकल्प येथे पाठविण्यात आले.महापालिकेने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभागनिहाय विसर्जन स्थळे गुगल मॅपव्दारा प्रदर्शित केल्यामुळे श्री गणेश भक्तांना विसर्जनासाठी जातांना होणारी अडचण आणि वाहतुक कोंडीमुळे होणारा ताण कमी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |