Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

अपघातग्रस्त जीवन पाटील यांना जीवनदान देण्यासाठी "एक हात मदतीचा" देण्यासाठी सर्व स्तरातून आवाहन

उरण दि ५ ( विठ्ठल ममताबादे ) : एक हात मदतीचा ही एक सामाजिक मोहीम आहे जे आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना मदत करण्यासाठी राबवली जाते. यामधून मानवतेची,भावनेची जपणूक होते. आपल्या मदतीचा एक छोटासा हात देखील कोणासाठी तरी खूप आशेचा किरण ठरू शकतो.

असाच एक मदतीचा हात उरण तालुक्यातील मोठे जुई गावचे रहिवासी व कोकण ज्ञानपीठाचे माजी विद्यार्थी जीवन आत्मराम पाटील यांना पाहिजे आहे. जीवन पाटील सध्या अपोलो हॉस्पिटल मध्ये अपघातग्रस्त अवस्थेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत. डॉक्टर त्यांच्यावर इलाज करत आहेत परंतु सदर उपचारासाठी डॉक्टरांनी ३५ लाख रुपयांचा खर्च सांगितले आहे.

त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे त्यांना अशक्य आहे त्यामुळे मित्रपरिवार सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांकडून आर्थिक मदत करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

त्यांच्या समूहातील मित्र परिवारांनी सांगितले आहे की आपल्या परीने दिलेली एक छोटीशी मदत सुद्धा जीवनच्या चेहऱ्यासाठी मोठा आधार बनू शकेल आणि आपल्या अपघातग्रस्त मित्राला वाचवण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची ही वेळ आली आहे.आपण सर्वांनी मानवतेचा विचार करून दिलेली मदत जीवन पाटील यांच्या उपचारासाठी त्यांच्या जीवनाचा आशेचा किरण ठरेल,एक अमृततुल्य ठरेल असा विश्वास त्याच्या कुटुंबियांनी व मित्र परिवारांनी व्यक्त केला आहे.

उपचारासाठी आवश्यक निधी गोळा करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे सहकार्याची व्यवस्था करण्यात आली आहे तरी दानशूर व्यक्ति, सामाजिक संस्था संघटना यांनी गुगल पे/ फोन पे/ पेटीएम यूपीआय कोड द्वारे तसेच बँक खात्या द्वारे त्यांना मदत करू शकतात ज्याद्वारे थेट रक्कम त्यांच्या खात्यात जमा करता येईल.
सहकार्यासाठी बँकेचा तपशील पुढील प्रमाणे

अकाउंट नाव - हेमंत माया पाटील, स्टेट बँक ऑफ इंडिया, अकाउंट नंबर ४१२४२१९०५७८
आय एफ एस सी एस बी आय एन ००९८३२
गुगल पे नंबर ९७०२९५९०५१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |